बेळगाव : बेळगावमध्ये स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सुरु असलेली कामे अपूर्ण स्थितीत आहेत. याविरोधात आज आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्मार्ट सिटी कार्यालयाला घेराव घातला. तसेच या योजनेत सुरु असलेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करत कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली.
आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयाला घेराव घालून आंदोलन केले. अपात्र उमेदवारांची बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडमध्ये नेमणूक करण्यात आली आहे. तसेच पात्र निष्ठावंतांकडे दुर्लक्ष करून डावलण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेतील बसस्थानक कामकाज अपूर्ण स्थितीत आहेत. कामाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांनी कलामंदिर येथील कामकाजासाठी मागविलेल्या निविदेत बनावट कागदपत्रे दिली असून संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची तक्रार यावेळी करण्यात आली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना आम आदमी पक्षाचे उत्तर विभागाचे प्रभारी राजकुमार टोपाण्णावर म्हणाले, सीबीटी बसस्थानकाच्या कामकाजात 17 टक्के अधिक कामकाज देण्यात आले आहे. याबाबत कोणत्याही राजकारण्यांकडून बोलण्यात आले नाही. सदर कामकाज 17 टक्के वाढवून अतिरिक्त पैसे उचलण्याचा डाव स्थानिक आमदार आणि स्मार्ट सिटी अधिकार्यांनी रचला आहे. यावर कारवाई झालीच पाहिजे. स्मार्ट सिटी योजनेतील भ्रष्ट अधिकारी आणि पीएमसी कंपनीने केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती सर्वांना आहे. 600 कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते आणि गटारीचे कामकाज करण्यात आले असून हि सर्व कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. पेवर्स कामकाजात देखील त्रुटी आढळून येत असून बसविण्यात आलेले पेवर्स उखडले जात असल्याचे टोपाण्णावर म्हणाले. या आंदोलनात आप नेते शंकर हेगडे, शिवानंद कारि, पाशा सय्यद, गंगाधर हुब्बेळप्पनवार, एम के सय्यद, समीर, निहाल, जुनेद, आदींसह इतर आप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Check Also
साठे प्रबोधिनीतर्फे काव्य सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन
Spread the love बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे …