बेळगाव : ठळकवाडी हायस्कूलच्या 1972 साली दहावी झालेल्या विद्यार्थ्याकडून आपल्या तत्कालीन शिक्षकांचा सन्मान करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. त्या वेळी शिकविलेले शिक्षक श्री. एम. आर. कुलकर्णी (वय वर्षे 82) आणि श्री. मल्लपगोळ सर (वय वर्षे 84) या दोघांचा शाल, गुलाबपुष्प आणि मिठाई देऊन गौरव करण्यात आला. टिळकवाडी येथे वास्तव्य असलेल्या श्री. कुलकर्णी सर यांच्या घरी विद्यार्थ्यांनी बुधवारी भेट देऊन हा सन्मान केला. यावेळी शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
याप्रसंगी विद्यार्थी सर्वश्री अनंत लाड, मोहन पवार, प्रमोद कुलकर्णी, बंडू शिंदगी, अंतोन कारवालो आणि भोमानी बिर्जे हे उपस्थित होते. 50 वर्षा पूर्वीच्या विद्यार्थ्यांनी हा आपुलकीचा कार्यक्रम केल्याबद्दल गुरुवर्यानी आनंद व्यक्त केला.
Belgaum Varta Belgaum Varta