बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित शिवराज हायस्कूल बेनकनहळ्ळी येथे गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु या गीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचा मुख्यमंत्री महेश हाजगोळकर या विद्यार्थ्यांने केले त्यानंतर शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक श्री. पी. आर. पाटील, श्री. आर. एन. पाटील, श्री. जी. आय. गुंजटकर, श्रीमती आर. ए. परब, रेखा पाटील, एल. पी. झंगरूचे, एस. पी. दाणनावर, एस. एम. पाटील, बी. पी. काटकर या शिक्षकांचा दहावी विद्यार्थ्यांच्याकडून श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी गुरु विषयी प्रबोधन केले. तसेच शिक्षकानी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी समीक्षा काटकर हीने गुरु विषयी कविता सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी सलोनी मंडलिक हीने तर आभार प्रदर्शन कुमारी वासंता वाळके हीने केले.