बेळगाव : दोनच दिवसांपूर्वी धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमधून एका तरुणीचे हृदय ग्रीन कॉरिडॉरद्वारे बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. ते हृदय एका मुस्लिम तरुणावर प्रत्यारोपण केल्यानंतर आता झीरो ट्रॅफिकद्वारे दुसरा अवयव धारवाडहून बेळगावला आणण्यात आला आहे.
धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमधून बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये झीरो ट्रॅफिक व्यवस्था उपलब्ध करून रुग्णवाहिकेतून आज किडनी आणण्यात आली. बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी स्वत: उभे राहून झीरो ट्रॅफिक व्यवस्था उपलब्ध केली. या मार्गावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धारवाडच्या एसडीएम हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या अठ्ठेचाळीस वर्षीय महिलेची किडनी बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यात येणार आहे.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …