
बेळगाव : वडगावची ग्रामदेवता मंगाईदेवी यात्रा येत्या 26 जुलै रोजी साजरी करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दोन वर्षांपासून यात्रा साजरी करण्यात आली नव्हती मात्र देवीचे धार्मिक विधी पारंपरिक पद्धतीने करण्यात आली होती. यावर्षी कोरोनाचे संकट बहुतांश कमी झाले आहे त्यामुळे या वर्षीची यात्रा उत्साहात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला आहे.
हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली मंगाई देवी ही शेतकर्यांची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. वडगावसह बेळगाव परिसरातील भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. या वर्षीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta