Sunday , November 24 2024
Breaking News

“हा माझा धर्म पशू बचाव दल”तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा उत्साहात संपन्न

Spread the love

बेळगाव : “हा माझा धर्म पशू बचाव दल”तर्फे सलग दुसऱ्या वर्षी वारकरी वेशभूषा स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. दि. 10 जुलै 2022 रोजी आषाढी एकादशी निमित्त हा माझा धर्म पशू बचाव दल तर्फे वारकरी वेशभूषा स्पर्धा (ऑनलाईन) घेण्यात आली. या स्पर्धेत शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. बेळगाव परिसरा सोबत ठाणे, कोल्हापूर, पंढरपूर आळंदी येथून स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 3 महिन्यांच्या तान्ह्या बाळापासून ते 61 वर्षांच्या आजीबाईंनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेची एक अट होती की झाड लावताना एक फोटो पाठविणे अनिवार्य होते. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या शंभरहून अधिक झाडे लावण्यात या संघटनेला यश आले. ही स्पर्धा आयोजित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आपली लोप पावत चाललेली वारकरी परंपरा जपणे. या स्पर्धेच्या माध्यमातून कित्येकांच्या घरात भक्तिमय वातावरण ठेवण्याचा एक छोटासा प्रयत्न या संघटनेने केलेला आहे.
या स्पर्धेसाठी विष्णू आनंदाचे, राजू राऊत आणि सुरज पवार यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक दिले. तसेच उदय नागवडेकर यांनी सर्व विजेत्यांना चषक दिले. वैजनाथ श्रीनाथ पाटील (कंग्राळी खुर्द), प्रणवी प्रशांत माळवी (खासबाग) आणि वल्लभ संदीप शिंदे (महागाव, गडहिंग्लज) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विनायक केसरकर आणि आशिष कोचेरी यांनी परिश्रम घेतले.

About Belgaum Varta

Check Also

कागवाड येथे भीषण रस्ता अपघातात दाम्पत्याचा मृत्यू

Spread the love  कागवाड : तालुक्यातील मंगळसुळी ऐनापूर रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचे वळणावर नियंत्रण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *