बेळगाव : बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक अम्लान आदित्य बिस्वास यांची बदली रद्द करण्याच्या मागणी साठी बेळगावमधील विविध संघटना, पक्ष आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले आहे.
बेळगावचे प्रादेशिक आयुक्त आणि बीम्सचे प्रशासक यांच्या बदलीचा आदेश आला असून सदर बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे विविध संघटना, पक्ष आणि नागरिकांच्यावतीने करण्यात आली आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ विविध संघटना, पक्षांचे नेते आणि नागरिकांनी एकत्रित येऊन आदित्य बिस्वास यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. अम्लान आदित्य बिस्वास यांनी अनेक उत्तम कामे करत आहेत. त्यांनी बीम्सच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. बीम्समध्ये येणाऱ्या रुग्णांना अनेकविध सुविधा उपलब्ध करून देण्यात त्यांचा महत्वाची कामगिरी केली आहे. यामुळे त्यांची बदली रद्द करण्यात यावी, असा आग्रही मागणी निवेदनामार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
याप्रसंगी सुजित मुळगुंद, वकील लातूर, संतोष कांबळे, शिवाजी सुंठकर, अनंतकुमार ब्याकुड, मुक्तार इनामदार, सुभाष कांबळे, शिवानी चलूवेटकर, कल्लाप्पा पाटील, डी. एम. चव्हाण, पी. एल. पावशे, किरण सुंठकर, शकील मुल्ला आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta