बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण संचलित येथील भाऊराव काकतकर महाविद्यालयात स्त्रियांच्या समस्या व उपाय या विषयावर पॅथॉलॉजिस्ट डॉ. आसावरी संत यांचे व्याख्यान पार पडले. योग्य आहार, व्यायाम आणि योगासन या त्रिसूत्रीचा अवलंब करून महिलांनी आपले आरोग्य कशा पद्धतीने टिकवावे याबद्दल मार्गदर्शन केले. स्त्रियांना जाणवणाऱ्या अडचणी व आरोग्याच्या समस्या याबद्दल विचारण्यात आलेल्या शंकांचे निरसन केले.
ऋणानुबंध या संस्थेच्या संस्थापक सदस्या व इनरव्हील क्लबच्या त्या सदस्य म्हणून डॉ. आसावरी संत या कार्यरत आहेत. कार्यक्रमाला वुमन्स वेल फेअर असोसिएशनच्या चेअरमन प्राध्यापिका अनिता पाटील, बॉटनी विभागाच्या नीता जाधव, रेड युथ क्रॉसच्या कविता पाटील व इतर प्राध्यापिका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta