Saturday , October 19 2024
Breaking News

भडकल गल्ली येथे भाग्यलक्ष्मी बॉण्ड वितरण

Spread the love

बेळगाव : दिनांक 16 जुलै 2022 रोजी जिल्हा पंचायत, महिला व बाल कल्याण विभाग, बाल विकास प्रकल्प, बेळगांव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांच्या संयुक्त विद्यमाने भाग्यलक्ष्मी बॉण्ड वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाग्यलक्ष्मी बॉण्ड आपल्या जवळच्या केंद्रातच उपलब्ध व्हावी जेणेकरुन लाभार्थ्यांची धावपळ होणार नाही तसेच फॉर्म भरताना कोणत्याही चुका होणार नाहीत. त्यामुळे सर्वांना एकाच ठिकाणी बॉण्ड वितरण करण्याचा कार्यक्रम आज भडकल गल्ली येथील बनशंकरी कार्यालयात पार पडला.
बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा देत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी भाग्यलक्ष्मी योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत अठरा वर्षे पूर्ण झालेल्या मुलींना शिक्षणाकरिता एक लाख रुपये निधी उपलब्ध होणार आहे.
जवळपास 5360 जणांना भाग्यलक्ष्मी योजनेचा बॉण्ड वितरित करण्यात आला आहे, असे आमदार अनिल बेनके यांनी बोलताना सांगितले. तसेच यावेळी त्यांनी भाग्यलक्ष्मी योजनेची सविस्तर माहिती लाभार्थ्यांना दिली.
या योजनेतील फायदे सारांशित केले आहेत. मुलाला जास्तीत जास्त रु.25,000 पर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळते. मुलीला दहावीपर्यंत वर्षाला 300 ते 1,000 रु. शिष्यवृत्ती दिली जाते. अर्ज केवळ मुलीचे आई-वडील व नैसर्गिक पालक करु शकतात. दरिद्य्ररेषेखालील म्हणुन ओळखल्या जाणार्‍या आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांमध्ये मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी, मुलींचा दर्जा वाढविणे ज्यामुळे समाजाचा दर्जा उंचावतो. काही अटींच्या पूर्ततेच्या आधीन राहुन मुलीला तिच्या आई/वडील/नैसर्गिक पालकाद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करणे. या लाभांव्यतिरिक्त, पालकांना अपघात झाल्यास 1 लाख रुपये आणि लाभार्थीच्या नैसर्गिक मृत्यूसाठी 42,500 रुपये मिळतात. 18 वर्षांच्या शेवटी लाभार्थीला 34,751 रुपये दिले जातील. पात्रता निकषांची सतत पूर्तता केल्यावर काही अंतरिम देयके जसे की वार्षिक शिष्यवृत्ती आणि विमा लाभ लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिले आहेत.
आज भडकल गल्ली येथे या बॉण्डचे वितरण करण्यात आले तसेच उद्या हनुमान नगर येथेही हे बॉण्ड वितरित करण्यात येणार आहेत तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी आमदार अनिल बेनके यांनी बोलताना केले आहे. भविष्यात फायद्यांसाठी तुम्ही संबंधित जिल्ह्यांच्या महिला आणि बाल कल्याण उपसंचालक किंव्हा बाल विकास प्रकल्प अधिकारी (उऊझज) किंव्हा जवळच्या अंगणवाडी कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.
यावेळी या कार्यक्रमाला आमदार अनिल बेनके, नगरसेवक फिरोज मुल्ला, शकील मुल्ला, सीडीपीओ लक्ष्मण बजंत्री, विलास केरुर यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका सहाय्यक शिक्षिका तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *