Wednesday , March 4 2026
Breaking News

उज्ज्वलनगर परिसर जलमय!

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला लागून असलेल्या उज्ज्वल नगरमध्ये ड्रेनेजची योग्य व्यवस्था नसल्याने महामार्गासह सर्व्हिस रोडवर वाहणारे पाणी रहिवाशांच्या घरात शिरून समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे रहिवाशांनी स्थानिक आमदार अनिल बेनके यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले असून, वाहनधारकांना होणारा त्रास सांगता येत नाही. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 च्या शेजारी असलेल्या उज्ज्वल नगरात पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पावसाचे पाणी सर्वत्र रस्त्यावर साचले आहे. त्यामुळे नागरिकांची व वाहनधारकांची गैरसोय होत आहे. आता सर्व रस्ते जलतरण तलावासारखे झाले असून शेजारच्या घरात पाणी शिरल्याने लोकांना त्रास होत आहे. त्यामुळे उज्ज्वलनगरातील रहिवाशांनी यासंदर्भात स्थानिक आमदारांकडे अनेकवेळा दाद मागूनही काही उपयोग झाला नसल्याचा संताप व्यक्त केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *