
बेळगाव : वडगाव कारभार गल्ली येथील लक्ष्मी पारकर यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेळगाव परिसरात सध्या पावसाचा जोर सुरू आहे. अतिपावसामुळे कारभार गल्ली वडगाव येथे घराची भिंत कोसळली. याची माहिती श्रीराम सेना अध्यक्ष रमाकांतदादा कोंडुस्कर यांना देण्यात आली. तातडीने कोंडुस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन आर्थिक मदत देऊ केली. यावेळी त्यांच्यासमवेत श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेचे स्थानिक संघटन प्रमुख श्री. राजेंद्र बैलुर, श्री. चेतन खन्नुकर, श्री. भरत नागरोळी, श्री. अभिषेक पुजारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta