बेळगाव : बेळगाव परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरे कोसळून आर्थिक नुकसान झाले आहे.
वडगाव परिसरात देखील अनेक ठिकाणी पाणी घरात शिरून बरेच नुकसान झाले आहे. तशीच परिस्थिती वडगाव अन्नपुर्णेश्वरी नगर 6 क्रॉस येथे सुद्धा विष्णू दत्ताराम दरेकर यांची झाली आहे. घरातील छप्पर गळत असून घरचा परिसर पाण्याने वेढला आहे. ते सध्या बाहेर राहतात. घरची परिस्थिती अत्यंत बिकट असून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
Belgaum Varta Belgaum Varta