
भाजपा युवा मोर्चा कार्यकारिणी बैठक
बेळगाव : आज दिनांक 18-07-2022 रोजी युवा मोर्चा कार्यकारिणी सभा भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ कार्यालयामध्ये संपन्न झाली.
सभेची सुरुवात दीपप्रज्वलन करून झाली. सभेचे प्रास्ताविक जिल्हा युवा मोर्चा प्रधान कार्यदर्शी चेतन पाटील यांनी केले. सभेला जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री. बसवराज नेसर्गी यांनी कार्यकर्त्यांना संबोधन करून सांगितले की, युवकांनी जास्तीत जास्त संघटनेमध्ये सहभाग घेऊन युवा मोर्चाला संघटित करावे.
याप्रसंगी सभेमध्ये भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. धनंजय जाधव याप्रसंगी म्हणाले की, प्रत्येक युवा मोर्चाच्या पदाधिकार्याने आपल्या क्षेत्रामध्ये जाऊन संघटन मजबूत करावे आणि केंद्र व राज्य सरकार यांच्या अनेक योजनांची माहिती व त्याचा लाभ आपल्या गावातील लोकांना करून द्यावा तसेच अग्निपथ योजनेद्वारा गावातील सर्व युवकांनी योजनेमध्ये सहभाग घेऊन देशाच्या रक्षणासाठी आपले योगदान दिले पाहिजेत हे सर्व समजून सांगा, असे त्यांनी म्हटले.
या सभेमध्ये ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष श्री. लिंगराज हिरेमठ यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. या सभेला बेळगाव मंडळ युवा मोर्चा प्रधान कार्यदर्शी श्री. विरभद्र पुजारी व श्री. प्रसाद बाचीकर उपस्थित होते. तसेच युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta