बेळगाव : मैत्रेयी कलामंच समूहातर्फे नुकतीच जत्तिमठ येथे गुरुपोर्णिमा साजरी झाली. प्रेमा शिवाजी मनवाडकर, नाझर कॅम्प वडगाव अंगणवाडी शिक्षिका (वडगाव) व जयश्री महादेव बडवण्णाचे, रिसालदार अंगणवाडी शिक्षिका (कंग्राळ गल्ली) या दोन अंगणवाडी शिक्षिकांचा साडीचोळी, श्रीफळ, पुष्प देऊन सन्मान करण्यात येऊन शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणुन तारांगणच्या सौ.अरुणा गोजे पाटील उपस्थित होत्या. वडगावच्या प्रेमा मनवाडकर यांचा सन्मान मैत्रेयी कलामंचच्या सदस्या स्मिता पाटील यांनी व कंग्राळ गल्लीच्या जयश्री बडवण्णाचे यांचा सन्मान मैत्रेयी कलामंच सदस्या स्मिता किल्लेकर यांनी केला. अरुणा गोजे पाटील यांचा सन्मान अस्मिता आळतेकर यांनी केला.
स्वागतगीत स्मिता किल्लेकर यांनी सादर केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन धनश्री मुचंडी यांनी केले. मैत्रेयी कलामंचचे हे पाचवे वर्ष चालू असल्याने यापुढे वरचेवर शैक्षणिक, सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्याचा आमचा नेहमी प्रयत्न राहील असे मनोगत प्रा. मनिषा नाडगौडा यांनी व्यक्त केले.
आभार डॉ. मेघा भंडारी यांनी मानले. दोन्ही शिक्षिकांचा परिचय अनुक्रमे विजया उरणकर व रोशनी हुंदरे यांनी करुन दिला. याप्रसंगी मैत्रेयी कलामंच सदस्या अस्मिता देशपांडे, शीतल पाटील, अपर्णा पाटील उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta