बेळगाव : उषःकाल मंडळाच्या वतीने मराठा बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक बाळासाहेब काकतकर यांचा सत्कार करण्यात आला. सोमवारी सकाळी कॅम्प येथील कोरे सर्कलमध्ये त्यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शिवाजीराव हंडे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर उषःकाल मंडळाच्या वतीने श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मराठा बँकेच्या आणि गणेश महामंडळाच्या माध्यमातून काकतकर अनेक समाज उपयोगी कामे केली असल्याचे गौरवोद्गार मध्यवर्ती महाराष्ट्र घेऊन समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर, माजी खासदार प्रभाकर कोरे, मराठा बँकेचे अध्यक्ष दिगंबर पवार संचालक लक्ष्मण होनगेकर शिवाजी हंगिरकर, चंद्रकांत गुंडकल, जयवंत मंत्री, नेताजी जाधव, नारायण किटवाडकर, प्रकाश चौगुले, बी. एस. पाटील, पी. के. जाधव, नेमिनाथ कंग्राळकर, महादेव चौगुले आदींनी काढत काकतकर यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी महेश कुगजी, विकास कलघटगी, अजित यादव, महेश आनंदाचे, अजित कोकणे, महेश हणमशेठ, कनुभाई ठक्कर, श्रीकांत देसाई, शेखर हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले नितीन आनंदाचे, संतोष धामणेकर, अशोक जैनोजी, आर. पी. पाटील, संगम पाटील आणि उषःकाल मंडळाचे प्रतिनिधी तसेच मराठा बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळासाहेब म्हणाले की ‘आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यांचा अमोल ठेवा माझ्या मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील. आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या सत्कार केला त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद देतो. शेवटी सुहास किल्लेकर आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta