बेळगाव : बेळगाव येथील ज्युनियर लिडर विंग सेंटरला जिओसी-इन-युनिट प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिमला येथे आयोजित कार्यक्रमात हे प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले. आर्मी ट्रेनिंग कमांडोचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चिफ लेफ्टनंट जनरल एस. एस. महाल यांच्या हस्ते हे प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
आर्मी ट्रेनिंग कमांडतर्फे ‘अ’ दर्जा प्राप्त चार लष्करी प्रशिक्षण केंद्रांना यावर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यामध्ये बेळगावमधील कमांडो विंगसह, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी चेन्नई, इलेक्ट्रॉनिक आणि मेकॅनिकल इंजिनिअर (ईएमई) स्कूल वडोदरा,120 इंजिनिअर रेजिमेंट यांचा समावेश आहे. 2020-21 सालात लष्करी प्रशिक्षण देण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.