Saturday , October 19 2024
Breaking News

खिळेगाव-बसवेश्वर योजना पूर्ण करणारच

Spread the love

आमदार श्रीमंत पाटील यांचा विश्वास : मतदार संघात हजारो कोटींची रस्ता कामे
कागवाड : कागवाड मतदारसंघातील उत्तर भागातील हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारा खिळेगाव- बसवेश्वर पाणीपुरवठा प्रकल्प कोणत्याही स्थितीत पूर्ण करणारच, असा विश्वास माजी मंत्री व कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केला.
कागवाड मतदारसंघातील महाराष्ट्र हद्दीला लागून असलेले अरळीहट्टी-शिरूर, मदभावी-जंबगी या रस्ता कामाचा शुभारंभ
अरळीहट्टी त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, खिळेगाव – बसवेश्वर पाणी पुरवठा प्रकल्प हा या भागातील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने याबाबत सांगितले आहे. यामुळे त्यांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली, पाटबंधारे विभागाच्या एमडींचा समावेश करून कडक आदेश दिले. आता ठेकेदाराला बिल दिले जात असून येत्या डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प सुरू होणार असल्याचे सांगितले.
सीमावर्ती गावातील अनेक रस्त्यांची गेल्या पन्नास वर्षांपासून दुरवस्था झाली होती. मी आमदार झाल्यानंतर सीमेवरील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण केले असून, आतापर्यंत सुमारे एक हजार कोटी रुपये खर्चाची रस्त्यांची कामे झाली असून, विकासात मतदारसंघ अग्रेसर बनला आहे. मी विरोधी पक्षासारखे खोटे बोलून मतदारसंघातील जनतेला खोटी आश्वासने देणार नाही. मी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम करत आहे. निवडणुकीत जनतेने माझे काम पाहिले आहे आणि माझ्या पाठीशी ते उभे आहेत. मी जिथे आहे तिथे जनता मला साथ देत आहे. यावेळी विनायक बगाडी, बंडू जाधव, आर. एम. पाटील, पीकेपीएस अध्यक्ष मुरगेप्पा मगदूम, ग्रामध्यक्ष बाळासाहेब जाधव, यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला ग्राम पंचायत अध्यक्ष बाळू हजारे, धोंडीराम आवळेकर, शिवाजी सातपुते, अब्दुल मुल्ला, डॉ. आर. पी. अवताडे, कंत्राटदार इर्शाद बारगीर, शेरअली बारगिर, प्रवीण सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची रविवारी बैठक

Spread the love  बेळगाव : एक नोव्हेंबर काळा दिन संदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *