बेळगाव : सौंदत्ती तालुक्यासह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना जेरबंद करण्यात सौंदत्ती पोलिसांना यश आले आहे.
गंगाधर रामप्पा तळवार यांची दुचाकी 29 जून 2022 रोजी मुनवळ्ळी येथील पंचलिंगेश्वर क्रॉसजवळ चोरीला गेली होती. याप्रकरणी दुचाकी मालकाने सौंदत्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून रामदुर्गचे डीवायएसपी रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. आय. नडूविनमनी आणि पीएसआय शिवानंद गुडगनट्टी आणि कर्मचारी यांनी प्रकरणाचा छडा लावण्यात यश मिळविले आहे. याप्रकरणी ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या तीन दुचाकी आणि कटकोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या 5 दुचाकींसह एकूण 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची अंदाजे किंमत 4 लाख रुपये आहे. आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या कारवाईबद्दल सौंदत्ती पोलिसांचे बेळगावचे एसपी डॉ. संजीव पाटील यांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta