बेळगाव : आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सोमवारी प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालयात जाऊन ऑटो आणि टिम्पो ट्रॅव्हलर्स चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत परिवहन आयुक्त आणि वरिष्ठ प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
ऑटो चालक आणि टेम्पो चालक हे कष्टकरी आहेत. कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वाहन कर्ज फेडावे लागते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्यांना कायदेशीर माहिती देण्याबरोबरच सौहार्दपूर्ण वागले पाहिजे. मनाप्रमाणे दंड ठोठावण्याचे, खटले भरण्याचे काम करू नका. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकार्यांना कायद्याचे पालन करून मानवतेने प्रतिसाद देण्याच्या सूचना केल्या.
पाऊस, वारा, थंडी याची तमा न बाळगता गरीब कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचे काम करतात. कायद्याचे उल्लंघन होत असल्यास त्यांना शिक्षित करण्याचे काम करा. एकाच चुकीसाठी त्यांच्यावर एकवेळ गुन्हा दाखल झाला आणि अनेक प्रकारे दंड झाला तर त्यांनी जगायचे कसे? त्यांना माणुसकीने वागवले पाहिजे. कोणालाही त्रास होऊ नये म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य करा असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी युवक काँग्रेसचे मृणाल हेब्बाळकर उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta