Wednesday , March 4 2026
Breaking News

मंगाईदेवी यात्रेला उत्साहात सुरुवात : लाखो भाविकांची गर्दी

Spread the love

 

बेळगाव : वडगावची आराध्य दैवत श्री मंगाईदेवी यात्रेला आजपासून सुरुवात झाली असून कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा साजरी करण्यात आली नव्हती. यावर्षी मात्र उत्साहात साजरी होत आहे.
वडगावच्या मंगाईदेवीच्या यात्रेला शेकडो वर्षांचा इतिहास आहे. मंदिरचा परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे. गोवा, महाराष्ट्र आदी ठिकाणांहून आलेल्या हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेऊन धन्यता मानली. शेकडो लोकांनी देवीच्या मंदिरावर कोंबड्या फेकून आनंदोत्सव साजरा केला जातो.
वडगावातील विष्णू गल्ली, पाटील गल्ली आदी ठिकाणी विकल्या गेलेल्या कोंबड्या खरेदी करणार्‍या भाविकांनी मंदिरावर फेकून देवाला अर्पण केले. मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उत्सव प्राचीन काळापासून चालत आला आहे.
काही भाविकांमध्ये मेंढ्याचा बळी देण्याची परंपरा आहे. सकाळी 10 वाजता मंगाई देवीची विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर 12 वाजता देवीची दुसरी आरती करण्यात आली. भाविकांची संख्या क्षणोक्षणी वाढत आहे.
या यात्रेत मंगाई देवीचं पूजन केल्यास पाऊस आणि पीक चांगले येईल, असा विश्वास आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने येऊन देवीची पूजा केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून डीसीपी रवींद्र गडाडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *