Wednesday , March 4 2026
Breaking News

अवैधरित्या साठवलेला 7 लाख रुपये किंमतीचा रेशन तांदूळ जप्त

Spread the love

बेळगाव : अवैधरित्या साठवलेला सुमारे सात लाख रुपये किमतीचा 320 क्विंटल रेशन तांदूळ जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना पकडण्यात बेळगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी अवैधरित्या साठवण्यात आलेला 320 क्विंटल रेशन तांदूळ जप्त केला आहे. सुमारे 7 लाखाहून अधिक किमतीचा हा तांदूळ असून याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हुंचेनट्टी येथील वासिम मुजावर आणि पिरनवाडी येथील संजय भोसले या दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात कायदेशीर कारवाईला सुरुवात करण्यात आली असून ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि डीसीपीनी कौतुक केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *