बेळगाव : बेळगावातील हंस टॉकीज रोडवरील मटका अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबीचे पोलिस निरीक्षक निंगनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव शहरातील मटका अड्ड्यावर छापा टाकून जुगार खेळणाऱ्या तिघांना अटक केली.
अभिषेक प्रकाश शिवापुर रा. पांगुळा गल्ली, शुभम लक्ष्मण तुपारी रा. खडक गल्ली आणि मदाचू कृष्णा गावडे रा. कंग्राळी के.एच. अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
अटक केलेल्यांकडून 18,700 रुपये रोख आणि 3 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. यासंदर्भात पीआय, सीसीबी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडेबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या विशेष मोहिमेत सहभागी झालेले पोलीस निरीक्षक निंगनगौडा पाटील व कर्मचारी एच. एस. निसुन्नवर, एम. एम. वडेयार, एस. एम. बजंत्री, वाय. डी. नदाफ यांच्या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta