फटाक्यांची आतषबाजी करून करण्यात आले लाडूंचे वाटप
बेळगाव : बेळगाव जिल्हा शिवसेनेच्यावतीने लोकमान्य टिळक चौक येथे शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कुद्रेमानी येथील वयोवृद्ध शिवसैनिक नागोजी कागीणकर यांच्या हस्ते केक कापून उद्धवजींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उद्धवजीना दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा शिवसैनिकांच्यावतीने देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना जिंदाबाद, उद्धवजी आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशी घोषणाबाजी करण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी करून लाडूंचे वाटप करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर आणि बेळगाव जिल्हा शिवसेना आरोग्य कक्षाचे जिल्हाप्रमुख दत्ता जाधव यांची समायोजित भाषणे झाली. त्यांनी बेळगाव जिल्हा शिवसेना उद्धवजींच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशी ग्वाही देत उद्धवजींचे दीर्घायुष्य चिंतिले.
याप्रसंगी शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख राजू तुडयेकर, प्रवीण तेजम, राजकुमार बोकडे, प्रकाश राऊत, जिल्हा संघटक रवींद्र जाधव, तालुका संघटक तानाजी पावशे, विनायक कोवाडकर, रिक्षा सेनेचे विजय मुरकुटे, बाळासाहेब डंगरले, प्रदीप सुतार, भाऊ किल्लेकर, सतीश जुटेकर, दिलीप नाईक, ज्ञानेश्वर मन्नुरकर, प्रकाश भोसले, विठ्ठल हुंदरे, संजय चतुर, शेखर शेट्टी, भरमा सावगावकर, संजय देसाई, प्रकाश हेब्बाजी, मंगेश नागोजीचे, शंकर बिर्जे, अनिल हट्टीकर, अब्दुल पाडगावकर, दत्ता गोडसे, युवा सेनेचे विनायक हुलजी, वैभव कामत, अद्वैत चव्हाण- पाटील, नील तवनशेट्टी, महेश मजुकर, उमेश देसाई, प्रणव बेळगावकर, वैष्णव जाधव, मल्हार पावशे, विदेश बडस्कर, प्रकाश सूर्यवंशी, जगन्नाथ मांजरेकर, महांतेश हवळपगोळ, श्रीकांत चांदेकर, महेश कदम, सुनील पेडणेकर, शब्बीर पटवेगार, संभाजी गोडसे, महेश गावडे यासह शिवसैनिक आणि लोकमान्य टिळक रिक्षा संघटनेचे सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta