Wednesday , March 4 2026
Breaking News

सक्षम जाधव वाढदिनी आयोजित गोल्डन स्क्वेअर बुद्धीबळ स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

बेळगाव : बुद्धीबळ, स्केटिंग, कराटे, क्रिकेट अशा विविध खेळांत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या सक्षम जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमी विशेष एकदिवसीय जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भाग्यनगर येथील गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीच्या सभागृहात फिडे तसेच एआयसीएफच्या नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने ही स्पर्धा खेळविण्यात आली.
नवशिक्या बुद्धीबळ खेळाडूंच्या विभागाकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत आर्यन कुलकर्णी, अंश बेळगावकर, श्रीशांत यलमळी, समिक्षा शिंदे, समर्थ कुलकर्णी तसेच आरुष्य मोहंती यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक पटकाविला.
मध्यस्तरीय खेळाडूंकरिता घेण्यात आलेल्या स्पर्धेत विघ्नेश मुतगेकर, रक्षित कल्याणशेट्टी, नील मंगनाईक, ईशान देसाई, सिद्धगणेश बन्नेनवर, वैभवी भट्ट तसेच सुयश उडकेरी यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचव, सहावा आणि सातवा क्रमांक पटकाविला.
ऍडव्हान्स लेव्हल बुद्धीबळपटूंच्या विभागात साई मंगनाईक, साकेत मेळवंकी, गीतेश सागेकर यांनी अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा तर निश्चल सखदेव, माधव दासरी साईप्रसाद खोकाटे यांनी अनुक्रमे चौथा, पाचवा आणि सहावा क्रमांक पटकाविला. स्पर्धा परीक्षक (अरबीट्रेटर) म्हणून रचना अनगोळकर यांनी काम पाहिले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या अंजली कुलकर्णी, विद्या दंडीन, संजय बेळगावकर तसेच प्रख्यात बुद्धीबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर, रचना अनगोळकर यांच्या हस्ते स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिल्या तिघां विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर अन्य विजेत्यांना पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहनार्थ प्रमाणपत्र देण्यात आले.
गोल्डन स्क्वेअर बुद्धिबळ अकादमीचे संचालक आणि बुद्धीबळ प्रशिक्षक प्रशांत अणवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा घेण्यात आली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *