बेळगाव : महसूल वाढविण्यासोबत थकबाकी वसूल करण्यासाठी पाऊले उचलण्याचा निर्णय बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याकरिता बहुमजली व्यापारी संकुल उभारणीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली.
ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. पाणी समस्येबाबत चर्चा करताना 24 तास पाणी पुरवठा योजनेच्या कक्षेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी बैठकीत दिली. त्यामुळे कॅन्टोन्मेंटचा समावेश 24 तास पाणी योजनेत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले. ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेअंती विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. विशेषत: पथदीप नादुरुस्त असल्याबाबबत समजल्याने तक्रारी होत आहेत. तसेच अनधिकृत बांधकामाबाबत कॅन्टोन्मेंटकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. पथदिपाच्या देखभालीकडे अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार सरकार नियुक्त सदस्य सुधीर तुपेकर यांनी केली. त्यामुळे अनधिकृत बांधकामाबाबत आवश्यकती कारवाई, पथदीपांची दुरुस्ती कारण्यासह अनधिकृत बांधकाम व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याचा आदेश ब्रिगेडीयर जॉयदीप मुखर्जी यांनी दिले. मराठा लाईट इन्फ्रंट्री सेंटर असल्याने कॅन्टोन्मेंट कार्यालय आवारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे या मागणीचा प्रस्ताव सुधीर तुपेकर यांनी बैठकीत मांडला. कायद्याच्या तरतुदीनुसार कार्यालयात प्रतिमा बसविता येत नाही अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली. पण, कायद्याच्या तरतुदीनुसार या प्रस्तावाचा विचार करू, अशी माहिती ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी बैठकीत दिली.
Belgaum Varta Belgaum Varta