Tuesday , December 9 2025
Breaking News

अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या बनावट फेसबुक अकाऊंटसवर कारवाई करा

Spread the love

 

बेळगाव : फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून पत्रकार, महिला, नागरिक यांची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे केली आहे.
शुक्रवार दिनांक 29 जुलै 2022 रोजी बेळगाव पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन काही फेसबुक अकाऊंटची चौकशी करा, अशी मागणी केली. या विषयी पत्रकार संघटनेच्या वतीने बेळगावच्या सायबर पोलिस स्थानकात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
बेळगाव शहरातील अनेक वेब पोर्टलना या बनावट अकाऊंटवरून बुद्धीभ्रम करणाऱ्या संदेशाचा नाहक त्रास होत आहे. काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या, समाजकंटक लोकांनी फेसबुकवर खोटी अकाऊंट काढून बदनामीकारक मजकूर प्रस्तुत केला जात आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडत आहे. अशा अकाऊंटवर कडक कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
बेळगावातील सोशल मीडियाद्वारे काम करणाऱ्या पत्रकारांना अशा खोट्या फेसबुक अकाऊंटमुळे कसा अडचणींचा सामना करावा लागतो. यासंबंधी समग्र चर्चा पोलीस आयुक्तांशी करण्यात आली. पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले.
पाटील तुषार, संकल्प पाटील, एस. पी. आणि सोमनाथ श्रीहरी या फेसबुक अकाऊंटद्वारे प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह पोस्टची त्वरित पडताळणी व चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक, माजी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, उपाध्यक्ष महेश काशीद, कार्यवाह शेखर पाटील, परिषद प्रतिनिधी सुहास हुद्दार, परशराम पालकर, प्रकाश बिळगोजी, दीपक सुतार, कृष्णा कांबळे उपस्थित होते.
बनावट प्रोफाइल काढून फसवणूक होण्याच्या वाढत्या घटनांच्या काळात बनावट फेसबुक अकाऊंटसवर कारवाईची मागणी करून जिल्हा मराठी पत्रकार संघाने एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यामुळे आता भविष्यात बनावट अकाऊंट काढणाऱ्यांना चाप बसणार हे निश्चित आहे.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *