बेळगांव : शिंदोळी येथील गोपाळ जिनगौडा एज्युकेशन ट्रस्ट संचालित देवेंद्र जिनगौडा इंग्रजी शाळेमध्ये विद्याभारती बेळगांव जिल्हास्तरीय ज्ञान विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे, संस्थेचे अध्यक्ष गोपाळ जिनगौडा, उपाध्यक्ष संदीप चिपरे, विद्याभारती प्रांत अध्यक्ष परमेश्वर हेगडे, विद्याभारती जिल्हा अध्यक्ष राघवेंद्र कुलकर्णी, संस्थेचे सेक्रेटरी कुंतुसागर हरदी, विद्याभारती विज्ञान प्रमुख होनंग्नूर, संतमीरा शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, देवेंद्र जिनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी पाटील, उपमुख्याध्यापिका रोशनी रॉड्रिग्स उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांचे हस्ते सरस्वती ओंकार भारतमाता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्याला प्रारंभ झाला. यात बेळगाव जिल्ह्यातील सी. व्ही. रामन स्कूल रामदुर्ग, महावीर स्कूल हुक्केरी, संत मीरा प्राथमिक व माध्यमिक स्कूल, अनगोळ. हनीवेल इंटरनॅशनल स्कूल खानापूर व देवेंद्र जिनगौडा स्कूल शिंदोळी, या शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात रसप्रश्न, विज्ञान प्रायोजन कार्य व ऑन द स्पॉट एक्सपिरिमेंट असे विषय ठेवण्यात आले होते. यामध्ये शिशुवर्ग बालवर्ग व किशोरवर्ग अशा तीन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती अमीनभावी तर वाणीश्री लोलेण्णावर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta