बेळगाव : भारतीय रेडक्रॉस सोसायटी कर्नाटक शाखेतर्फे रेडक्रॉस जिल्हा शाखेच्या माध्यमातून सांबरा बेळगाव येथील हवाई दल केंद्राला 20 हजार विदेशी पुनर्वापर फेसमास्क देणगी दाखल वितरित करण्यात आले.
भारतीय रेडक्रॉस सोसायटीच्या पदाधिकारी व सदस्यांनी सांबरा हवाई दल केंद्राच्या ठिकाणी जाऊन एअर फोर्स स्टेशनचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. श्रीधर यांच्याकडे 20000 फेसमास्क सुपूर्द केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. एस. बी. कुलकर्णी यांनी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भातील रेडक्रॉस सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती काळात हवाई दलाकडून देशभरात आणि विदेशात केल्या जाणाऱ्या समयोचित मदतीची प्रशंसा केली.
हवाई दलाला फेसमास्क देणगी दाखल देण्याच्या प्रक्रियेसाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांनी विंग कमांडर डॉ. सुमित लखवीर यांचेही आभार मानले. यावेळी एअर कमोडोर एस. श्रीधर यांनी रेडक्रॉस सोसायटीला कृतज्ञते दाखल स्मृतीचिन्ह प्रदान केले.
याप्रसंगी भारतीय रेडक्रॉस सोसायटीचे राज्य समिती सदस्य डॉ. एस. बी. कुलकर्णी, बेळगाव जिल्हा कार्यकारी समितीचे सदस्य विकास कलघटगी आणि राज्य आपत्ती निवारण चमूचे सदस्य एल. व्ही. श्रीनिवासन उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta