बेळगाव : बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचा वर्धापन दिन सोमवार दिनांक १ ऑगस्ट रोजी आहे. वर्धापन दिनानिमित्त पत्रकार संघाच्या कुलकर्णी गल्ली येथील पद्मावती चेंबर्स येथील पत्रकार भवन येथे सकाळी साडे दहा वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. दत्ता नाडगौडा हे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. वर्धापन दिन कार्यक्रमाला सदस्य, पत्रकार आणि हितचिंतकांनी उपस्थित राहावे, असे पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांनी कळवले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta