Saturday , March 7 2026
Breaking News

आधार क्रमांक मतदार यादीशी जोडण्याच्या प्रक्रियेला बेळगावात प्रारंभ

Spread the love

 

बेळगाव : आधार क्रमांक मतदार यादीशी जोडण्याच्या प्रक्रियेचा लोकार्पण सोहळा डीसीपी रवींद्र गडाडी आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याहस्ते संपन्न झाला.
यावेळी बोलताना डीसीपी रवींद्र गडादी म्हणाले की, मतदार यादीशी आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. डिसेंबरमध्ये दुरुस्ती केली. शासनाने कोणताही कार्यक्रम राबविला तर त्याची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व अधिकार्‍यांची आहे. त्यामुळे नवीन 18 वर्षांच्या मुलांना याची माहिती देण्याचे काम करा. प्रत्येक घरात जाऊन सर्व माहिती घेऊन ती लिंक करण्याचे काम करा, असे ते म्हणाले.
अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी म्हणाले की, भारतीय निवडणूक आयोगाने आणलेल्या दुरुस्तीबाबत बीएलओ, महाविद्यालयाचे प्राचार्य आणि बीएलओ पर्यवेक्षकांनी चांगली मोहीम राबवावी. आधार कार्ड लिंकिंग 31-03-2023 पर्यंत 100% पूर्ण झाले पाहिजे. दुहेरी मतदान रोखण्याच्या उद्देशाने निवडणूक आयोगाने याची अंमलबजावणी केली असल्याचे ते म्हणाले.
महापालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी म्हणाले की, पारदर्शक मतदार यादी तयार करण्यासाठी आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. आधार लिंकिंगमुळे बनावट मतदार सहज ओळखता येतात. त्यामुळे पारदर्शकपणे निवडणुका घेणे शक्य होईल, असे ते म्हणाले.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *