Sunday , July 26 2026
Breaking News

बनावट अकाऊंटचा वापर करून बदनामी करणार्‍यांवर लवकरच कारवाई; बी. आर. गड्डेकर यांची माहिती

Spread the love

 

बेळगाव : पत्रकार महिला आणि नागरिकांची बनावट अकाऊंटद्वारे बदनामी करणार्‍यांवर कायद्याच्या चौकटीतून लवकरच कारवाई केली जाईल, असे ठोस आश्वासन बेळगाव सायबर पोलीस स्थानकाचे निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी दिले.
सोमवारी सकाळी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास अध्यापक यांच्या नेतृत्वाखालील पत्रकार संघाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक गडेकर यांची भेट घेतली आणि मागील आठवड्यात दाखल केलेल्या तक्रारीचा पाठपुरावा केला.
बेळगावातील नामांकित वेब पोर्टलची काही समाजकंटकाकडून फेसबुकवर बनावट अकाऊंट काढून बदनामी केली जात होती, त्या विरोधात मराठी पत्रकार संघाने थेट पोलीस आयुक्त यांनी बोरलिंगय्या आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल होताच बनावट अकाऊंट डिलीट करण्यात आलेली आहेत. मात्र अकाऊंट डिलीट झाले तरी बदनामी करणार्‍यांवर कारवाई करणारच, असे आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले आहे.
सोशल मीडियावर फेसबुकचे बनावट अकाऊंट काढून जे कोणी पोस्ट केलेल्या बातम्यांवर उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त करून एखाद्या व्यक्तीची, संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर निश्चितच मी कायद्याच्या चौकटीतून कारवाई करू, असे ठोस आश्वासन बी. आर. गड्डेकर यांनी दिले आणि मराठी पत्रकार संघाने दिलेल्या तक्रारीनुसार फेसबुक अकाऊंटवरून ज्यांनी काही प्रतिकूल कॉमेंट्स केलेले आहेत त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे आणि हे फेसबुक अकाऊंट कुणाची आहे ते आम्हाला निश्चितच समजेल आणि ते समजल्यानंतर आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करू असे आश्वासन बी. आर. गड्डेकर यांनी बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हा पत्रकार संघटनेचे कार्यवाह शेखर पाटील, विकास कलघटगी, सुहास हुद्दार, डी. के. पाटील, प्रकाश बिळगोजी, संजय चौगुले, दिनेश नाईक आदी उपस्थित होते.
बनावट अकाऊंट काढणार्‍या त्या टोळीची चौकशी साहेबांनी सुरू केली असून संकल्प पाटील, पाटील तुषार आणि सोमनाथ श्रीहरी या टोळी तपास घेतला जात आहे. लवकरच त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *