बेळगाव : यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता सुरुते ग्राम पंचायतकडून श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आला. चार वर्षाच्या मागील अतिवृष्टीमुळे यळेबैल-सुरुते संपर्क रस्ता बर्याच वर्षापासून खराब व झालेला रस्ता त्याचबरोबर मोठ-मोठी भगदाड पडलेली आहेत. यामुळे प्रवास करणे धोकादायक झाले आहे. लहान मोठे अपघात घडलेले आहेत. त्याचबरोबर या गावातील बससेवा गेले तीन-चार वर्ष बंद झालेली आहे. दोन तीन किलोमीटर विद्यार्थ्यांना पायी चालून प्रवास करावा लागत आहे. रस्ता दुरुस्ती करण्याबाबत निवेदन लोकप्रतिनिधींना देण्यात आले होते. त्यांनी प्रत्यक्षात भेट देऊन रस्ता दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिलेले आहे. परंतु अजून पर्यंत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती या रस्त्याची झालेली नाही. शेवटी कंटाळून सुरूते पंच कमिटी यांच्याकडून माती टाकून खड्डे बुजवण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta