बेळगाव : दि. 31जुलै 2022 रोजी शाईन स्पोर्ट्स कराटे अकॅडमी यांच्यावतीने सुलेमानिया हाॅल लक्षमेश्वर, गदग येथे झालेल्या 4थ्या नॅशनल इनविटीशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या इंडियन कराटे क्लबला एकूणच प्रथम जनरल चॅम्पियनशिप देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत इंडियन कराटे क्लबचे 144 कराटेपटू सहभागी होऊन त्यांनी कटाज व कुमिटे स्पर्धेत 88 सुवर्ण, 61 रौप्य आणि 135 कास्य अशी एकूण 284 पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत विविध राज्यांमधून 900 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
तर या स्पर्धेचे संयोजक एस. आर. पीरजादे यांनी बेळगावच्या इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गजेंद्र काकतीकर यांना शाल व चषक देऊन त्यांना सन्मान करण्यात आले व तसेच सर्व शिक्षकांना सुध्दा शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांना सुध्दा सन्मान करण्यात आले.
वरील सर्व विजेत्या कराटेपटूंना कराटे मास्टर श्री. गजेंद्र काकतीकर, हेमलता ग. काकतीकर व प्रशिक्षक विठ्ठल भोजगार, प्रभाकर किल्लेकर, परशुराम काकती, निलेश गुरखा, हरीष सोनार, नताशा अष्टेकर व विनायक दंडकर या सर्वांचे मार्गदर्शन लाभत आहे.