बेळगाव : भाषिक अल्पसंख्याक कायद्यानुसार मराठी कागदपत्रे मराठीतून मिळावीत या मागणीसाठी 8 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून मराठी भाषिकांची जिद्द आणि मराठी बाणा दाखवून द्यावा, असे आवाहन शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.
शहर समितीच्या बैठकीत ते बोलत होते.
समितीची चळवळ ही कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली आहे. मराठी माणसांच्या जिद्दी आणि निष्ठा हीच समितीची खरी ताकद आहे. सीमाभाग महाराष्ट्रात विलीन व्हावा हा एकच उद्देश आहे, त्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी आपण लढत राहिले पाहिजे, असे मत दीपक दळवी यांनी व्यक्त केले तर माजी महापौर मालोजी अष्टेकर म्हणले की, कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात जनजागृती करून मराठी भाषिकांनी बहुसंख्येने आंदोलनात सहभागी व्हावे व हे ठिय्या आंदोलन यशस्वी करावे.
मराठी माणसांच्या मतावर निवडून येऊन मराठी भाषेविरुद्ध बोलणार्या लोकप्रतिनिधींचा महादेव पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला.
यावेळी शिवराज पाटील, अमित देसाई, रणजित चव्हाण पाटील, सुरज कणबरकर यांनी आपले विचार मांडले.
यावेळी प्रकाश मरगाळे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, चंद्रकांत कोंडुस्कर, विकास कलघटगी, किरण धामणेकर, शिवानी पाटील, साधना पाटील, बाबू कोले, विनोद आंबेवाडीकर, महेश जुवेकर, दत्ता उघाडे यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
कर्नाटक कोचिंग सेंटरमधून 50 हून अधिक विद्यार्थ्यांची एसएससी जीडी 2024 परीक्षेमध्ये निवड
Spread the love बेळगाव : विनय ल्हासे सर आणि श्रीशैल तल्लुर सरांच्या मार्गदर्शनाखाली एकाच कोचिंग …