बेळगाव : सार्वजनिक वाचनालय याच्या वतीने क्रांतिसिंह नाना पाटील यांची 122 वी जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. वाचनालयाचे ज्येष्ठ कार्यकारी सदस्य गोविंद राऊत यांच्या हस्ते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी महापौर गोविंद राऊत यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी स्वागत केले. कार्यवाह रघुनाथ बांडगी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर, सहकार्यवाह सौ. लता पाटील, कार्यकारी सदस्य वकील आय. जी. मुचंडी, अभय याळगी, सौ. सुनीता मोहिते, अनंत लाड, डॉ. विनोद गायकवाड, संतोष नलवडे व आजीव सदस्य एस. व्ही. कुलकर्णी उपस्थित होते.