बेळगाव : वारसा प्रमाणपत्र करून देण्यासाठी लाच स्वीकारताना अथणी तालुक्यातील बेळगिरी गावचे ग्रामसेवक आणि तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.
वारसा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आलेल्या बेळगिरी येथील ग्रामस्थाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दहा हजार पाचशे रुपये लाच मागितली होती. त्या रकमेची ऍडव्हान्स तीन हजार रुपये घेतेवेळी बेळगिरीचे तलाठी उमेश धनादमनी आणि ग्रामसेवक प्रल्हाद सनदी या दोघांना एसीबी पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
दोन्ही अधिकाऱ्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून एकोणीस हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta