आ. श्रीमंत पाटील : संबरगी जनसंपर्क सभेत अधिकाऱ्यांना कडक सूचना
अथणी : गटारी पाणी यासह सर्वसामान्यांना अनेक समस्या असू शकतात समस्या कोणतीही असो, एखादी सामान्य व्यक्ती अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांची समस्या तातडीने सोडवा अन्यथा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला.
संबर्गी येथे जनसंपर्क सभा व तक्रार निवारण बैठकीत आमदार पाटील बोलत होते. यावेळी विविध विषयावर चर्चा करून अनेकांच्या समस्या जाग्यावरच सोडण्यात आल्या. सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार श्रीमंत पाटील यांनी जनतेच्या समस्या जाणून घेत अनेक समस्यांचे जागेवरच निराकरण केले. कोणी अतिक्रमण केले असेल तर त्याला सूचना द्या व अतिक्रमण काढा, सरकारी नियमानुसार कारवाई करा, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आजूबाजूच्या खेड्यातील अनेक लोक त्यांची जनावरे घेऊन येतात त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखाना स्वच्छ ठेवा, अशी सूचनाही आमदारांनी केली. ते म्हणाले, दुष्काळी भागाचा कायापालट करण्याचा माझा उद्देश असून हा परिसर सर्वच दृष्टीने हरित क्रांती करण्यासाठी प्रयत्नशील आहे. यावेळी ग्रामस्थांनी संबरगी, अजूर रस्त्यावर अग्रणी नदीवरील पुलाची उंची वाढवावी. संबरगी – नागनूर रस्ता करावा. लक्ष्मी मंदिराजवळ शुद्ध पाण्याची सोय करावी.
यावेळी अनेकांनी मांडलेल्या वीज समस्या, जमिनीच्या तक्रारी त्यांनी जागेवरच सोडविल्या.
यावेळी तहसीलदार सुरेश मुंजे यांनी महसूल विभागातील कोणत्याही अडचणी असल्यास माझ्याशी संपर्क साधावा, असे सांगितले. यावेळी शेखर करबसापागोळ, विराण्णा वाली, अभियंता श्रीकांत माकानी, संजयकुमार सदलगे, वेंकटेश कुलकर्णी, ग्रा. पं. अध्यक्षा सरिता सातपुते, शिवाजी सातपुते, राम सोड्डी, अण्णाप्पा मिसाळ, अब्दुल मुल्ला, बसगौडा पाटील आदी उपस्थित होते.
Check Also
भातासाठी ३ हजार रुपये आधारभूत किंमत द्या : राज्य शेतकरी संघ व हरित सेना
Spread the loveबेळगाव : राज्य शेतकरी संघ व हरित सेनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाताच्या पिकासाठी ३ …