Tuesday , April 29 2025
Breaking News

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ अध्यक्षपदी रमाकांत कोंडुस्कर

Spread the love

बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्तानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांची सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी तर देवस्थान कमिटी पंच रणजीत चव्हाण पाटील कार्याध्यक्षपदी निवड झाली.
पाटील गल्ली येथील सिद्धनाथ जोगेश्वरी मंदिराच्या सभागृहात रविवारी सायंकाळी मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये 2022-23 साठी कोंडुस्कर यांची सर्वानुमते महामंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
महामंडळाच्या स्वागताध्यक्षपदी मदन बामणे, सरचिटणीस महादेव पाटील, उपाध्यक्षपदी रमेश पावले, रमेश कळसन्नावर, सतीश गोरगोंडा, बाबुलाल राजपुरोहित, शिवराज पाटील यांची तर सचिवपदी सागर पाटील आणि बळवंत शिंदोळकर, जनसंपर्क प्रमुख पदी विकास कलघटगी म्हणून निवड झाली आहे.

गणेश मंडळांनी विधायक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, गणेश मंडपातून चिकनगुनिया, डेंग्यू लसीकरण शिबिरे, रक्तदान शिबिरे, व्यसनमुक्त समाज बनवण्यासाठी जनजागृतीची व्याख्याने, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, गोरगरिबांना आधार देणे आर्थिक मदत करणे असे सामाजिक उपक्रम राबवून समाजाच्या जडणघडणाला हातभार लावला पाहिजे, असे रमाकांत कोंडुस्कर यांनी प्रतिपादन केले.

About Belgaum Varta

Check Also

मनोरुग्णांना औषोधोपचारासोबत समाजाचे पाठबळ आवश्यक : डॉ. आनंद पांडुरंगी

Spread the love  संजीवीनी फौंडेशनची नई दिशा एकदिवशीय कार्यशाळा संपन्न बेळगाव : मानसिक आजाराला कायमस्वरूपी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *