बेळगाव : गोल्फ कोर्स परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी सहा पिंजरे आणि पंधरा ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दरम्यान गोल्फ मैदानाजवळील ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या कैद झाला आहे. मात्र सर्वांना धडकी भरवणारा बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात केव्हा कैद होणार याचीच सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे.
गेले तीन दिवसांपासून बिबट्या शोधासाठी अथक प्रयत्न सुरू असताना त्याचा कुठेच थांग पत्ता लागू शकलेला नाही. जाधव नगर जवळील गोल्फ मैदान परिसरात पिंजरे आणि ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहेत. येथील ट्रॅप कॅमेरामध्ये बिबट्या दिसून आला आहे. बिबट्याच्या वावरामुळे जाधव नगर, हनुमान नगर, सदाशिवनगर, बॉक्साइड नगर येथील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रॅप कॅमेरामध्ये कैद झालेला बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात केव्हा कैद होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta