
अभिमानास्पद बाब
बेळगाव : येळ्ळूर येथील येळ्ळूरवाडी शाळेमध्ये सुंदररित्या लिहिल्या गेलेल्या फलक लेखनाचा नमुना पाठ्यपुस्तकात नमूद करण्यात आला आहे ही अभिमानास्पद बाब आहे.
येळ्ळूर येथील सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडीमधे येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील आणि शाळेच्या निवृत्त शिक्षिका सौ. अनुपमा रेवणकर यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. हि बातमी आणि या संबंधित फोटो त्यावेळी सोशल मीडयाद्वारे व्हायरल झाले होते. त्यावेळी अतिशय सुंदररित्या लिहिल्या गेलेल्या फलक लिखाणाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आणि कर्नाटक सरकार सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने या फलक लिखाणाचा नमुना अध्ययन पुनर्प्राप्ती (कलिका चेतरीके) 2022 – 23 या इयत्ता सहावीच्या प्रथम भाषा मराठी विद्यार्थी कृती पुस्तकात दिला गेला आहे. ही येळ्ळूर वासियांसाठी अभिमानास्पद बाब असुन सर्वत्र याची चर्चा होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta