बेळगाव : क्रांती दिन पार पडला. त्याचबरोबर संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज बुधवारी बेळगाव येथील स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान विठ्ठलराव याळगी यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणींना उजाळा करून दिला. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉक्टर बोरलिंगय्या यावेळी उपस्थित होते.