बेळगाव : नेताजी गल्ली बस्तवाड (हलगा) येथील रहिवासी परशराम काकतकर यांचे गेल्या चार दिवसांपासून पडणाऱ्या सततच्या पावसामुळे राहते घर कोसळले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. काकतकर कुटुंबियांचे राहते घर कोसळल्यामुळे जीवनोपयोगी वस्तूंचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र राहते घर अचानक कोसळल्यामुळे काकतकर कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे.
सध्या सर्वत्र पावसाचा जोर सुरू आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी जुन्या घरांची पडझड सुरू आहे. प्रशासनाने याची दखल घेऊन काकतकर कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta