बेळगाव : काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तुम्मुरगुद्दी गावातील अनेक घरांची पडझड झाली असून बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
तुम्मुरगुद्दी गावात 10-12 घरांची पडझड झाली असून रहिवाशांचे हाल होत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घरे गमावलेल्या कुटुंबांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला आणि लवकरात लवकर शासनाकडून योग्य ती भरपाई देण्याचे काम हाती घेण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गावातील नेते व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.