Wednesday , December 10 2025
Breaking News

मराठा सेवा संघातर्फे मराठा युवा, युवती, महिला उद्योजक मेळावा संपन्न

Spread the love

बेळगाव : मंगळवार दिनांक ०९/०८/२०२२ रोजी मराठा सेवा संघ वडगाव बेळगावच्या ४ थ्या वर्धापन दिनानिमित्त श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन (ओरिएंटल स्कूल), बेळगाव येथे मराठा युवा, युवती, महिला उद्योजक मेळावा घेण्यात आला.
तरी या मेळाव्याला प्रमुख वक्ते म्हणून हजारो युवा उद्योजक निर्माण करणारे आणि लोकांच्या जीवनात टर्निंग पॉईंट ठरलेले महाराष्ट्राचे माईंड ट्रेनर विठ्ठल कोतेकर, राजेंद्र मुतगेकर, संचालक चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, माजी नगरसेवक नेताजी जाधव, यश ऑटोचे संजय मोरे, आर्किटेक्ट आणि इंजिनिअर आर. एम. चौगुले, मराठा समाज सुधारणा मंडळचे अध्यक्ष
प्रकाश मरगाळे, प्रभात कास्टिंगचे विक्रम सैनूचे, बेळगाव. बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, मंगलमूर्ती इंफ्राटेकचे रमेश पाटील, खानापूर युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील, क्लासवन गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एस. एल. चौगुले, नवहिंद को -ऑपरेटिव्ह सोसायटी अध्यक्ष उदय जाधव, ह. भ. प. शंकर बाळकृष्ण बाबली, अध्यक्ष बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटना महादेव मारुतीराव चौगुले, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे, विलास भावकू देवगेकर, माजी एपीएमसी सदस्य महेश जुवेकर, माजी मग बसवंत मारुती हलगेकर, काँट्रॅक्टर सुनील बसवंत मायाण्णाचे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर, दिपक कोले, नितीन धामणेकर, प्रशांत धामणेकर, शशिकांत नंद्याळकर, मनोहर घाडी, प्रवीण कदम, रोहन धामणेकर, मनोहर पाखरे, प्रकाश धामणेकर, रमेश खेमनाळकर, बाबू मजूकर, प्रवीण कुंडलकर, मधू मुचंडी, गौतम गावडे, क्रांती कदम, सदस्य आणि युवा, युवती, महिला उद्योजक व व्यावसायिक उपस्थित होते.
मेळाव्याचे सूत्र संचालन अनिल हुंदरे (शिक्षक) व सौ. ऐश्वर्या मेणसे (शिक्षिका) यांनी केले. प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे अध्यक्ष किरण धामणेकर यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत दिपक कोले यांनी केले.

सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, जिजाऊ पूजन आणि शिवपूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन मराठा सेवा संघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
तसेच प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर, ऍड. सुधीर चव्हाण, राजेंद्र मुतगेकर, महादेव चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.
सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत युवकांना त्यांचा उद्योग, व्यवसाय चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
प्रमुख वक्ते विठ्ठल कोतेकर यांचे समृद्धीची मानसिकता यावर व्याख्यान झाले.
मराठा सेवा संघाचे सेक्रेटरी मनोहर घाडी यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर सीबीआयचा छापा

Spread the love  बेळगाव : टेंडर वाटप आणि बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या तीव्र आरोपांनंतर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *