बेळगांव : आजादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा भव्य बाईक रॅली बेळगांव उत्तर मतदारसंघात भाजपा युवा मोर्चा बेळगांव महानगर व भाजपा उत्तर मंडळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली.
यावेळी श्री. राजेश जी (राज्य संघटना प्रधान कार्यदर्शी) म्हणाले की, आता आम्ही 75 च्या वर्षाच्या अमृत महोत्सवात आहोत हे आमचे सौभाग्य आहे. भारताला स्वातंत्र्य आणुन दिलेल्या अनेक हुतात्मांना स्मरण करण्यासाठी या स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचा उद्देश आहे. आजच्या या आपल्या सुखी जीवन जगत असल्याचे मुख्य कारण म्हणजे त्या हुतात्म्यांनी आपल्या जीवनाचे समर्प्रण केले. या सर्व हुतात्मांना अभिवादन आहे.
त्यानंतर आमदार अनिल बेनके बोलताना म्हणाले की, कर्नाटक राज्यातील बेळगांवमध्ये पहिली तिरंगा बाईक रॅलीची सुरुवात केली आहे. बाईक रॅलीची सुरुवात दिनांक 10 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता झाली. अशोक चौक पासून चालू होऊन कित्तुर राणी चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौक, डॉ. बी. आर. आंबेडकर गार्डनकडून किल्ला तलाव भारत ध्वजाकडे समाप्त झाली. या बाईक रॅलीतून स्वातंत्र अमृत महोत्सवाबद्दल जागृती केली.
या बाईक रॅलीत आमदार अनिल बेनके यांच्या समवेत श्री. महेश टेंगीनकाई (राज्य भाजपा सरचिटणीस व राज्य भाजपा युवा मोर्चा प्रभारी), श्री. राजेश जी (राज्य संघटना प्रधान कार्यदर्शी), श्री. इरण्णा अंगडी (सेक्रेटरी भाजपा कर्नाटक राज्य), श्री. राजन्ना मठपथी (प्रभारी इगधच महानगर), श्री. श्रेयस नाकाडी (राज्य कार्यकारिणी सदस्य भाजपा), श्री. प्रसाद देवरमनी (अध्यक्ष भाजपा महानगर जिल्हा बेळगांव), श्री. सदानंद गुंटेप्पण्णावर (अध्यक्ष भाजपा उत्तर मंडळ बेळगांव) व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta