Tuesday , March 3 2026
Breaking News

बिबट्याची दहशत कायम!: उद्याही “त्या” 22 शाळांना सुट्टी

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील २२ शाळांना उद्या गुरुवार दि. 11 रोजी पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जाधव नगरमध्ये आढळलेला बिबट्या जेरबंद न झाल्याने जाधव परिसरातील 22 शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.

गोल्फ कोर्सवर कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला.
मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी वाढवण्यात आली आहे. डीडीपीआय बसवराज नलटवाडा आणि शहराचे बीईओ रवी बजंत्री यांनी सांगितले की, जिल्हा आयुक्तांनी यासंदर्भात आदेश जारी केला आहे.

गुरुवार ११ रोजी या खालील शाळांना सुट्टी असणार आहे.
केंद्रीय विद्यालय क्रमांक 2 आणि वनिता विद्यालय, मराठी विद्यानिकेतन, एन पी ई टी क्लब रोड के एल ई इंटरनॅशनल स्कुल कुवेम्पू नगर, सरकारी प्राथमिक शाळा विश्वेश्वरय्या नगर, सरकारी मराठी शाळा सदाशिवनगर यासह हनुमान नगर, सह्याद्री नगर, कुवेम्पू नगर आणि सदाशिवनगर कन्नड प्रथिमक, सेंट झेवियर्स स्कुल, दूरदर्शन नगर कन्नड प्राथमिक शाळा आणि हिंडलगा ग्राम पंचायतीतील शाळांना अशा एकूण २२ शाळांना बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *