बेळगाव : गेल्या 14 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक यांच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी महावीर भवन, बेळगावी येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे असे जितो फाउंडेशनच्या रक्तदान शिबिर समन्वयक अभय आदिमानी यांनी सांगितले.
बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, यावर्षी संपूर्ण भारत देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असून या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जितो संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर या शिबिराला बेळगावातील नागरिकांचे खूप सहकार्य आणि प्रोत्साहन मिळाले. यावेळीही विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. याशिवाय केएलई ब्लड बँक, महावीर ब्लड बँक, बीम्स ब्लड बँक, बेळगाव ब्लड बँकही आम्हाला सहकार्य करत आहेत , असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी अनेक वेगवेगळ्या संस्थांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. पण आम्ही उपस्थित असलेले रक्तदान शिबिर विशेष आहे. 15 ऑगस्टपासून रक्तदात्यांना 1 लाख रुपयांची विमा योजना राबविण्यात येत आहे. दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने जनता व्यक्तिगत अपघात पॉलिसी योजनेंतर्गत रक्तदात्यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी 1 लाख रुपयांची विमा योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.ही योजना बेळगावातील पहिलीच आहे. १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या भव्य रक्तदान शिबिरात बेळगाव शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे. अधिक माहितीसाठी 9845286152 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत जितो बेळगाव विभागाचे अध्यक्ष पुष्पक हणमन्नवर, सचिव अमित दोशी कार्यक्रम प्रकल्प अधिकारी हर्षवर्धन इंचल, केकेजी झोन सचिव विक्रम जैन, दि. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या सहाय्यक मॅनेजर रतन रामगोंडा, केएलई रक्तपेढीच्या मॅनेजर श्रीकांत व्ही. विरगी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta