Wednesday , March 4 2026
Breaking News

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘हर घर तिरंगा’ उपक्रमातंर्गत जनजागृती रॅली

Spread the love

बेळगाव : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरोघरी तिरंगा फडकविण्यासाठी सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच शहरात तसेच तालुक्यातील प्रत्येक घरांवर राष्ट्रध्वज फडकवावा यासाठी कॅम्प येथील सेंट जोसेफ शाळेच्यावतीने जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीत 100 तिरंगा ध्वज हातात घेवून विद्यार्थ्यांनी तसेच सहभागी शाळेतील पालक यांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. पंढरी नगरी, झांज, मृदुंगाच्यागजरात भारत माता की जय, वंदे मातरम यांनी दुमदुमून निघाली. कॅम्पात विविध ठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. यावेळी देशभक्तीपर गीत तसेच पुष्पवृष्टी करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने कॅम्पातील वातावरण चैतन्यमय झालेले पहावयास मिळाले.
रॅलीमध्ये विद्यार्थी, शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कॅम्प पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सुमन पवार यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेच्या उपप्राचार्य आरोग्या, मॅनेजर नातालिया डेमोलो, टिचर मारिया, अक्षता, रेखा, नितासह अन्य टिचर उपस्थित होते.
सेंट जोसेफ शाळेतून रॅलीची सुरुवात झाली. ही रॅली कॅम्प पोलीस ठाणे फिश मार्केट, कोंडपा गल्ली, स्वामी बेकरी, कोटरी मेडिकल, हायस्ट्रीट सेंट जोसेफ मैदान येथे समारोप करण्यात आला.
समारोपप्रसंगी सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. यावेळी सर्व नागरिकांनी दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत आपल्या घरांवर तिरंगा ध्वज फडकवून ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी सुनिल जाधव, सोनाली खोत, परवेज किणीकर, नदीम फतेखान, मोनो सिंग, सुनील कुमार पॉल, जागृती वाळवेकर, रिजवान बेपारी, समीर दळवी, गायत्री सावंत, कविता गावकर, डॉ. अनिल पाटील, स्नेहल काकतीकर यांच्यासह अन्य पालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बोडकेनट्टीत शनिवारी गिरणी कामगारांची बैठक

Spread the love  बेळगाव  : एकेकाळी मुंबईच्या कापड गिरण्यांमध्ये सिमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील हजारो कामगार घाम …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *