Wednesday , December 10 2025
Breaking News

आजादी का अमृत महोत्सवानिमित्त सुभाष नगर येथे आमदार अनिल बेनके यांनी केले वीर जवानांना अभिवादन!

Spread the love

 

बेळगाव : शनिवार दिनांक 13 ऑगस्ट 2022 रोजी सुभाष नगर येथील जवान क्वार्टर्समध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी सहभागी होऊन देशासाठी आपले बलिदान दिलेल्या वीर जवानांच्या फोटोला पुष्प अर्पण करुन त्यांना स्मरण करुन नमन केले व वीर जवानांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
यावेळी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, प्रथमत: आजादी का अमृत महोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा. सुभाष नगर येथील जवान क्वार्टर्समध्ये हा विषेश कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद व अभिनंदन. 1971 साली झालेल्या युद्धात देशासाठी आपले बलिदान, ज्यांनी आपले योगदान दिले, हुतात्मा ज्यांनी स्विकारला अशा या सर्व वीर जवानांना अभिवादन केले.
यावेळी देशासाठी आपले बलिदान दिलेले दशरत निंगपगोळ, बाबुराव माणगांवकर, फकिरा अनगोळकर, सतीश सुर्यवंशी, राहुल भोपाळे, दिनकर भांदवडे, येशु चौगुले, रामचंद्र हिप्परगी, क्रिष्णाजी कब्बुर, दत्ताराम शिंदोळकर, जयवंत पाटील, मोहन कांबळे, सदाशिव पडदले, शामराव शिंदे या हुतात्म्यांना स्मरण करुन नमन केले.
तसेच देशासाठी आपले बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचे श्रीमती विमल माणगांवकर, श्रीमती निंगपगोळ, श्रीमती छाया शिंदे, श्रीमती सोनाबाई अनगोळकर, श्रीमती हिराबाई भांदवडे, श्रीमती जयश्री सुर्यवंशी, श्रीमती निलवा पडदले, श्रीमती शांताबाई कांबळे, श्रीमती बाबासाहेब भोपाळे, श्रीमती शांताबाई अनगोळकर, श्रीमती यल्लुबाई कांबळे, श्री. भारत पाटील, श्री. विलास कब्बुर, श्री. संभाजी चौगुले या सर्व वीर जवानांच्या कुटुंब सदस्यांची भेट घेतली.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव कँटोन्मेंट बोर्ड कार्यालयावर सीबीआयचा छापा

Spread the love  बेळगाव : टेंडर वाटप आणि बेकायदेशीर भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या तीव्र आरोपांनंतर, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *