बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केपीटीसीएल, बेळगाव यांच्यावतीने केपीटीसीएल कर्मचाऱ्यांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला बुद्धीबळपटूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धा अर्बिटर म्हणून सक्षम जाधव यांनी काम पाहिले.
या स्पर्धेत दिनेश भिर्डे यांनी पहिला क्रमांक, शितल सनदी यांनी दुसरा तर संजीव हमन्नवर यांनी तिसरा क्रमांक पटकाविला.
उद्या सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी होणाऱ्या बक्षीस वितरण कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta